2) सेंद्रिय शेती योजना :-
मानवी आरोग्य आणि पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने सेंद्रिय शेतीला अनन्यसाधारण महत्व आहे. जमिनीचे आरोग्य, पोत, आणि सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी सेंद्रिय शेती ही काळाची गरज आहे अशी भूमिका भारतीय कृषी संशोधन परिषदेने ( आय. सी. ए. आर. ) आणि के. वि. के. महाराष्ट्राने मांडली आहे. देशाच्या कृषी संशोधनाच्या क्षेत्रातील सर्वोच्च संस्था असल्याने भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या ( आय. सी. ए. आर. ) भूमिकेला महत्व आहे.
सेंद्रिय शेती योजनेमध्ये एन. पी. आर. फिड & प्रोसेस प्रा. लि., मत्स्य व पशुधन विकास मंडळ आणि के. वि. के. महाराष्ट्र यांच्या संलग्न / संयुक्त ( Joint Venture ) प्रकल्पाद्वारा गांडूळ खत निर्मिती, सीपीपी कल्चर युनिट, सेंद्रिय शेतीशाळा, अभ्यास दौरे, समूह संघटनांसाठी अर्थसहाय्य या सारख्या विविध योजनांचा समावेश आहे, तसेच सेंद्रिय पद्धतीने उत्पादन, सेंद्रिय प्रमाणीकरण, विक्री व्यवस्थापन या बाबी राबविण्यात येणार आहेत.