इतर प्रकल्प

एनपीआर फिड & प्रोसेस प्रा. लि. द्वारा महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यात सामान्य व्यक्ती, सुशिक्षित बेरोजगार, शेतकरी तसेच गरजवंताना त्यांचे उत्पन्न वाढून त्यांना उदरनिर्वाहासाठी हातभार लागावा म्हणून कोंबडी, टर्की, आणि बदक इत्यादींचे वितरण करण्यात येईल. तसेच त्यांच्या वाढीसाठी आणि संगोपनासाठी योग्य मार्गदर्शन आणि प्रशिक्षण देण्यात येईल.

१) मत्स्य पालन :-

देशातील भोगोलिक परीस्थितीत जमीन, पाणि, वापराबद्दल कुठेतरी सीमा आहेत, मर्यादा आहेत, ह्यामुळे पारंपारिक पद्धतीने शेती करणे अवघड आहे, त्यामुळे मत्स्य व्यवसायात दिवसेंदिवस नविन संशोधन होतच आहेत.

तलावांची तयारी :

यामध्ये पाण्यातील भक्षक आणि तण यांच्या पासून मुक्त करून, नैसार्गिक खाद्य, चारा माशांसाठी तयार / उपलब्ध होईल. तसेच अनावश्यक वनस्पतीचे उच्चाटन करणे, माती आणि पाणि यांचे गुणतत्व वाढविणे ह्या सर्व बाबींचा समावेश होऊन तलाव निर्मिती होते.

मत्स्यबीज साठवणूक :

तलावामध्ये मत्स्यबीज टाकण्यापूर्वी खत घालून तो तयार करावा लागतो. चांगले उत्पादन येण्यासाठी मोठ्या आकाराचे मत्स्य बियाणे तलावात सोडावे, कारण लहान आकाराचे मत्स्यबीज तलावात सोडल्यास त्यांची मरतुक जास्त प्रमाणात होऊ शकते आणि त्यांची वाढ होण्याची गती सुद्धा कमी असते म्हणजेच त्यांच्या वाढीचा वेग हा कमी असतो, परिणामी कमी उत्पादन विक्रीयोग्य होण्यास वेळ लागतो.

मत्स्यबीज पाण्यात सोडतांना पूर्ण तलावातील पाण्याचा वापर होईल अशा पद्धतीने बीज टाकणे म्हणजेच पाणाच्या तळाशी राहणारा मासा, पाण्याच्या मधल्या भागात राहणारा मासा, आणि पाण्याच्या वरच्या भागात राहणारा मासा अशा प्रकारे मत्स्यबीज टाकून संपूर्ण तालावातील पाण्याचा वापर करता येतो, परिणामी उत्पादन वाढ होते.

मत्स्यशेती का? :

मागील काही वर्षात या क्ष्रेत्रात झालेल्या तंत्रशास्त्रीय प्रगतीमुळे शेततळे आणि तलावातील सरासरी राष्ट्रीय पातळी सुमारे २००० कि. ग्रा. / हेक्टर पेक्षा अधिक झालेली आहे. माशांच्या प्रजाती, पाण्याचे स्त्रोत, खतांची उपलब्धता, चाऱ्याचे स्त्रोत, ई. आणि शेतकऱ्यांची गुंतवणूक करण्याची क्षमता यांना सोयीस्कर अशा नवनवीन पध्दतीही देशात विकसित झालेल्या आहेत.

खाद्य :

मत्स्य खाद्यामध्ये शक्यतो शेंगदाणे, मोहरी, सोयाबीन तेलाची मळी आणि तांदळाची पेंड यांचाच वापर तोही मर्यादित होतो, परंतु आता हल्लीच्या वेळी आधुनिक तंत्रज्ञान वापरून उत्पादन वाढ होत असल्याने मत्स्यशेती करण्याकडे बऱ्याच लोकांचा कल वाढत आहे. त्यामुळे उत्पादन वाढ उच्च होण्यासाठी वनस्पती आणि प्राणांच्या प्रथिनांमधील घटक देखील माशांच्या खाद्यामध्ये समाविष्ट करण्यात येत आहेत. वनस्पती आणि प्राणांच्या प्रथिनांमधील घटकांना एकत्र करून मशिनीच्या साह्याने गोळ्या / पेलेट बनविल्या जातात आणि हे माशांना खाद्य म्हणून वापरात येतात.

तलावाचे व्यवस्थापन :

मातीच्या थरामध्ये असलेल्या पोषण द्रव्याच्या आधारे तलावाचे वर्गीकरण करावे. जेविक खत मत्स्यबीज टाकण्यापूर्वी १५ दिवस आधी टाकून जेविक खताच्या ३०% खत टाकावे. उरलेले जेविक खत दीड – दोन महिने कालावधी नंतर टाकत राहावे लागते. टप्प्या टप्प्यामध्ये जेविक खतामध्ये बदकांची विष्टा, घरगुती सांडपाणी, शेण, पोल्ट्रीविष्टा, डुकराची विष्टा ई. घटक पाण्यात टाकावे. पाण्यात समावेश केल्याने मत्स्यशेती साठी लागणारी सर्व पोषक द्रवे माशांना मिळतात.

व्यावसायिक कार्प माशांचे प्रकार :

कटला, रोहू आणि मृगळ असे तीन भारतीय कार्प मासे संवर्धन केले जाते. तसेच या सोबतचे चंदेरी, गवती आणि सामान्य असे परदेशी मासे सुद्धा मत्स्यशेती साठी उपयुक्त ठरतात. कार्प मासे भारतातील मत्स्य शेती संवर्धनाचा मुख्य आधार असून देशातील एकूण उत्पादनाच्या ९०% भाग व्यापतात.

पाणी तपासणी :

पाणी तपासणी सुद्धा महत्वाची असल्याने गरजेची आहे. यामध्ये पाण्यातील प्राणवायूचे (ऑक्सिजनचे प्रमाण), अमोनिया, नायट्रोजन ह्या घटकांचा पाण्यात विरघळलेल्या स्वरूपाची तपासणी महत्वाची ठरते. ह्या तपासण्या करण्याकरिता वेगवेगळ्या केमिकल्स बाजारात उपलब्ध आहेत.

माशांची विक्री :

बाजारात विकण्यायोग्य आकार झालेल्या माशांची वेळोवेळी चाळणी करून विक्री करणे आवश्यक असते त्यामुळे तलावातील पाण्यावरील ताण कमी होवून इतर माशांना वाढवण्यासाठी जागा उपलब्ध होवून त्यांची वाढ ही जोमाने होते, अशा प्रकारे मत्स्यशेती करून उत्पन्न मिळविता येते.

२) कुक्कुट पालन :-

आपल्या महाराष्ट्रात पिढ़ीजात घरोघरी महिला 5 किंवा 10 कोंबड्या सांभाळून त्या पासून उच्च प्रथिन युक्त अंडी अणि चिकन आपल्या कौटुंबिक गरजेपुरते मिळवत असत, परंतु व्यावसायिक दृष्टिकोनाचा अभाव, मार्गदर्शन ना मिळाल्याने तसेच जागेची कमतरता या मुळे त्यांची संख्या मर्यादित राहिली. आता वेळ आली आहे की आपण गावातच राहून शहरांत माल पोहचवू शकतो आणि अशा प्रकारच्या पारंपारिक व्यवसायाला आधुनिकतेची जोड देऊन भरपूर उत्पन्न मिळवू शकतो.

३) शेळी पालन :-

शेळी पालन हा शेतीपूरक व्यवसाय असून कमीतकमी भांडवल व कमीतकमी जागेत हा व्यवसाय करता येण्यासारखा आहे. शेळयांना इतर जनावरांपेक्षा जसे की गाई , म्हैस यांपेक्षा खूप कमी प्रमाणात खाद्य लागते. साधारणत: एका गाईला लागणार्‍या खाद्यामध्ये १० शेळ्या जगू शकतात. त्यामुळे अल्प भूधारकांसाठी हा व्यवसाय अतिशय फायदेशीर आहे.खाद्याचे , शेळयांच्या आरोग्याचे , निवार्‍याचे व पिण्यासाठी लागणार्‍या पाण्याचे योग्य नियोजन केल्यास हा व्यवसाय अतिशय फायदेशीर ठरतो.

४) टर्की पालन :-

टर्की पालन दोन पद्धतीने करता येते, एक तर शेतात कुंपण करून आणि दुसरे घरे बांधणी करून. एक एकर शेतात सभोवताली तारेचे कुंपण घालून २५० ते ३०० टर्की पक्षी पालन करता येतात. प्रत्येक टर्की पक्षास सभोवताली कुंपणाच्या आत मोकळे फिरता यावे यासाठी प्रत्येक पक्षास ४ चो. फुट या प्रमाणात जागा राहील अशी व्यवस्था करावी. तसेच पक्ष्यांना चांगल्या प्रकारे कुंपणामधेच फिरविणे सुद्धा महत्वाचे आहे.

कोंबडीच्या मानाने आकाराने मोठा असल्याने त्यांना जागा जास्त लागते. कोंबडीच्या तुलनेने टर्की पक्षामध्ये मासांचे प्रमाण सुद्धा हाडाच्या तुलनेने जास्त असते. तसेच यांच्या मासात जास्त प्रथिनाचे प्रमाण आणि कमी कोलेस्टेरॉंल या गुणधर्मामुळे या मांसाला लीन मिट म्हणतात. टर्की पक्षी वयाच्या १६ ते २४ आठवड्यामध्ये विक्री करण्यायोग्य होतात.

टर्की पक्षाचे संगोपन करतांना पाच माद्यामागे एक नर टर्की पक्षी ठेवणे योग्य असते. टर्की पक्षाच्या एक दिवसीय पिल्लाचे सरासरी वजन हे ५० ते ५५ ग्राम इतके असते. आणि चार महिन्यात प्रोढ नर टर्की पक्षाचे वजन हे ५ ते ६ किलोग्राम आणि मादा टर्की पक्षाचे वजन हे ४ ते ५ किलोग्राम असते. टर्की मादा पक्षाचे वार्षिक अंडी देण्याचे प्रमाण हे सरासरी ९० पर्यंत असू शकते. तसेच अंड्याचे सरासरी वजन हे ६० ते ६५ ग्राम असते. अंडी देण्यास टर्की मादा पक्षी हा सहाव्या महिन्यापासून सुरवात करतो. तसेच टर्की पक्षी पिल्लू उबवून अंड्यातून बाहेर येण्यासाठी साधारण पणे २८ दिवस कालावधी लागतो.

टर्की पालन दोन पद्धतीने करता येते, एक तर शेतात कुंपण करून आणि दुसरे घरे बांधणी करून. एक एकर शेतात सभोवताली तारेचे कुंपण घालून २५० ते ३०० टर्की पक्षी पालन करता येतात. प्रत्येक टर्की पक्षास सभोवताली कुंपणाच्या आत मोकळे फिरता यावे यासाठी प्रत्येक पक्षास ४ चो. फुट या प्रमाणात जागा राहील अशी व्यवस्था करावी. तसेच पक्ष्यांना चांगल्या प्रकारे कुंपणामधेच फिरविणे सुद्धा महत्वाचे आहे.

 

आरोग्य व्यवसाथापन :

टर्की पक्षांना कुठलेही आजार होऊ नये त्यासाठी काळजी घ्यावी . त्यांचे निवासाचे ठिकाण नेहमी स्वच्छ् ठेवावे. ह्या पक्ष्यांना जंत ह्यांचा संसर्ग होऊ नये यासाठी ह्या पक्षांना ३० ते ४० दिवसांच्या अंतराने किंवा महिन्यातून निदान एक वेळा जंतुनाशक देऊन टर्की पक्षांचे संरक्षण करावे. तसेच बाह्य परजीवांचा संसंर्ग होऊ नये यासाठी ह्या पक्षांचे महिन्यातून एक वेळा डीपिंग करावे. टर्की पक्षांची हाताळणी करतांना पक्षांना इजा होऊ नये याची काळजी घ्यावी. कोंबड्याप्रमाणे जास्त वेळ उलटे टांगणे किंव्हा लोंबकळत ठेवणे ह्या पक्षांना अपायकारक ठरू शकते. पक्षी इतर आजारापासून, विकारांपासून दुर राहील कुठलाही संसर्ग त्यांना होऊ नये म्हणून वेळोवेळी पक्षांना लसीकरण करावे जेणे करून त्यांच्या वाढीमध्ये कुठलीही बाधा येणार नाही, अशा प्रकारे पक्षांची काळजी घ्यावी.

खाद्य / आहार :

टर्की पक्षाचा खाद्यामध्ये पावडर करून किंवा पेलेट खाद्याचा उपयोग केला जाऊ शकतो. प्रत्येक पक्षी वाढीसाठी चांगला पौष्टिक आहार हा अत्यंत गरजेचा असतो. कॅल्शियमची गरज ह्या पक्षाला जास्त असते त्यामुळे अतिरिक्त सप्लीमेंट म्हणून कॅल्शियमचा समावेश ह्या पक्ष्यांच्या आहारात करावा जेणे करून वाढ चांगली होऊन उत्पादन वाढ होईल.

५) बटेर पालन :-

बटेर अर्थात लाव पक्षी आकाराने अतिशय लहान असून ह्या पक्षाचे मास अतिशय रुचकर असते. ह्या पक्षाचे अंडी ही आकाराने लहान असली तरी त्यातील समाविष्ट घटकांच्यामुळे ती अंडी गर्भवती स्त्रिया आणि लहानमुले अतिशय आवडीने रोजच्या आहारात समावेश करू शकतात.

बटेर पालनाच्या पद्धती :

ह्या पक्षी पालनासाठी दोन पद्धतिचा अवलंब केला जातो. एक म्हणजे केज पद्धती आणि दुसरी डीप लिटर पद्धती परंतु असे असले तरी व्यावसायिक स्वरुपात पालन करण्यासाठी केज पद्धती उपयोगात आणली जाते आणि कमी जागेत अधिक उत्पादन घ्यायचे झाल्यास पिंजरे एकावर एक रचून व्हर्टिकल म्हणजे माळे रचून ठेवले जातात.

आहार :

हे पक्षी आकाराने लहान असतात. एक पक्षी पूर्ण वाढ झालेला १७५ ते २०० ग्राम वजनी असतो. साधारण पणे एक किलो पक्षी वजन होण्यासाठी दोन ते अडिच किलो खाद्य लागते. हे पक्षी आकाराने लहान असल्याने खाद्य सामाग्रींच्या कणांचा आकार बारीक असावा आणि पूर्ण वाढ झालेल्या पक्षाला साधारणपणे ३० ते ४० ग्राम खाद्य लागते.

बटेर पालनाचे फायदे :

 1. पक्षांचा आकार लहान असल्याने कमी जागा लागते. साधारणपणे एक कोंबडीसाठी जेवढी जागा लागते तेवढ्या जागेत १२ पक्षी राहू शकतात.
 2. लाव पक्षी काटक प्रजाती असल्याने कोंबड्याप्रमाणे आजारात लवकर बळी पडत नाही, त्यामुळे ओंषधींचा आणि इतर खर्च जवळपास लागतच नाही किंवा लागला तरी कमी प्रमाणात लागतो.
 3. चार ते पाच आठवड्यात पक्षी विक्रीयोग्य तयार होतो, त्यामुळे गुंतवलेले भांडवल लवकर परतावा देते.
 4. आकाराने लहान असल्याने खाद्य सुद्धा कमीच लागते, जागाही कमीच लागते, भांडवल सुद्धा कमीच लागते त्यामुळे अल्प गुंतवणूक करून हा व्यवसाय उभा राहू शकतो.
 5. एक लाव मादा पक्षी साधारणपणे सहा ते सातव्या आठवड्यात अंडी घालायला सुरवात करते आणि ३०० ते ३१५ अंडी घालते. अंडी जास्त प्रमाणात मिळवण्यासाठी पौष्टिक खाद्याचा घटकांचा पक्ष्याच्या आहारात समावेश करावा.
 6. लाव पक्षाचे मास हे कोंबडीच्या मासांच्या तुलनेत अधिक चवदार / रुचकर असे असते. ह्या लाव पक्षाच्या मासामध्ये चरबीचे प्रमाण कमी असल्याने लहान मुलांच्या वाढीसाठी फार उत्तम असते.
 7. गरोदर स्त्रियांना देखील लाव पक्षाचे मास उत्तम पोषक आहार आहे.
 8. लाव पक्षाचा अंड्यात कोलेस्ट्रॉल कमी असल्याने लहानमुले आणि गरोदर स्त्रिया देखील ही अंडी खाऊ शकतात किंवा आपल्या आहारात समाविष्ट करू शकतात.

६) बदक पालन :-

कृषी आणि कृषिपूरक व्यवसाय आपल्या लोकसंखेच्या आहार विषयक गरजा भागविण्याचा प्रयत्न करीत आहेत. सतत वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे दुध, अंडी, मांस या पूरक उत्पादनास मोठी बाजारपेठ उपलब्ध आहे. आज असे चित्र दिसून येते कि, परदेशी संस्था भारतातील बाजारपेठांचा अभ्यास करून वेगवेगळ्या क्षेत्रात प्रवेश करीत आहेत. यंत्रसामुग्री सोबतच खाद्यपदार्थ, शीतपेयांची बाजारपेठ ताब्यात घेण्याचे त्यांचे प्रयत्न चालू आहेत. 

अशावेळी भारतीय शेतकऱ्यांनी देखील विविध कृषी उद्योग, कृषी माल प्रक्रिया उद्योग, अन्न प्रक्रिया उद्योग, दुध व दुग्धजन्य पदार्थ, मांस व मांसजन्य पदार्थ यांच्या प्रगतीस प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष हातभार लावला पाहिजे. अंडी आणि मांस हा मानवाच्या आहाराचाच भाग असून उत्पादन मात्र गरजेएवढे नाही, हे सांगायला कोणी ज्योतिषाची गरज नाही. देशातील अंडी आणि मासांचा विचार केल्यास दरडोई दरवर्षी केवळ ३५ अंडी व ३०० ग्रॅम कोंबड्यांचे मांस उपलब्ध होते. ही उपलब्धता अल्प असल्याने विविध कृषिपूरक व्यवसायांवर शास्त्रीय पद्धतीने सर्वांगीण विचार होऊन ज्या ज्या भागात अशा व्यवसायांना वाव मिळू शकतो तेथे तेथे त्यास प्रोत्साहन देऊन असे व्यवसाय वाढीस लागतील असे प्रयत्न होणे हे एकविसाव्या शतकाचे आव्हान आहे.

बदक पालनाचे फायदे :

 1. बदकाची अंडी आणि मास खाणे लोकांना फार आवडते.
 2. बदकांच्या सुधारित प्रजाती वर्षासाठी सरासरी ३०० ते ३२५ अंडी उत्पादन करतात.
 3. अंड्याचे वजन सुद्धा जास्त असून साधारणपणे ६० ते ६५ ग्राम वजन असते.
 4. बदकाला पाण्यात राहणे आवडते त्यामुळे पाण्यात राहून पाण्यातील किडे, किटक खाऊन खाद्यावरील खर्च कमी होतो.
 5. कोंबड्यांच्या तुलनेत बदकांची उत्पादन क्षमता अधिक असते.
 6. बदकांच्या वयाच्या दुसऱ्या, तिसऱ्या वर्षी व्यावसायिक दुष्टीकोनातून सुद्धा हे फार उत्तम आहे.
 7. बदक ही काटक प्रजाती असल्याने जास्त आजार पहावयास मिळत नाही त्यामुळे साहजिकच औषधाचा आणि इतर खर्च कमी होतो.
 8. बदकामध्ये रोग प्रतिकार शक्ती जास्त असते.
 9. वाहत्या पाण्यात बदकांना खूप आवडते आणि वाहते पाणि बदकांसाठी खूप उपयुक्त असते.
 10. बदक हे रात्रीतून अंडी घालतात त्यामुळे सर्वच्या सर्व अंडी मिळतात.
 11. कोंबड्यांच्या तुलनेत बदकांची वाढ ही खूप जलद होत असते.

बदकांची गुण वैशिष्टे :

 1. बदक कळप करून राहतात.
 2. बदक अंडी रात्रीतून घालतात.
 3. कोंबड्यांपेक्षा वाढ जलद होते.
 4. कोंबड्यांच्या तुलनेत बदकांची जास्त काळजी घ्यावी लागत नाही.
 5. बदक हे कोंबड्यांपेक्षा जास्त काटक असते.
 6. बदकांच्या खाद्यातील खर्च कोंबड्यांच्या तुलनेने फारच कमी असतो.

७) ससे पालन :-

कमी जागेत, कमी खर्चात, सहज होणारा व कुटुंबातील स्त्री, निवृत्त व्यक्ती किंवा अपंग व्यक्तींच्या मदतीने सहज हाताळता येईल, असा एक नाविन्यपूर्ण व्यवसाय म्हणजे मांसासाठी ससेपालन. सशाची शिकार पूर्वापार केली जात आहे. ससेपालनापासून वर्षभर उत्पन्न घेता येते. त्यामुळे शेतीपूरक किंवा एक स्वतंत्र व्यवसाय म्हणूनही ससेपालन व्यवसायाकडे पाहता येईल.

ससेपालनातून अनेक प्रकारची उत्पादने मिळू शकतात व त्यामुळे अनेक प्रकारे उत्पन्न मिळू शकते. उदा. थंड हवेच्या ठिकाणी लोकरीसाठी ससेपालन, केसाळ कातडीसाठी विविध जाती विकसित झालेल्या आहेत. त्याचप्रमाणे मांस उत्पादनासाठी मोठ्या आकाराच्या जाती उपलब्ध आहेत. ससे औषधनिर्मिती प्रयोगशाळेत वापरतात.

ससे पालनाचे फायदे :

 1. ससे पालनासाठी भांडवल कमी लागते त्यामुळे गरीब शेतकरी, बेरोजगार तरुण हा व्यवसाय अगदी सहजपणे करू शकतात.
 2. ससे पालन बागेत, घराच्या छतावर किंवा शेतात करता येते.
 3. ससे आकाराने लहान असल्याने ससे पालनासाठी जागा कमी लागते, त्यामुळे बांधकामासाठीचा खर्च कमी लागतो.
 4. ससे घरातील उरलेले अन्न, सहजपणे उपलब्ध असलेला पाला, पाचोळा, धान्य, टाकून दिलेला भाजीपाला खातात, त्यामुळे त्यांच्या खाद्यावर येणारा खर्च कमी होतो.
 5. सशांच्या मांसात प्रथिने भरपूर असल्याने लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण हे मास खाऊ शकतात.
 6. सशांची वाढ चांगली होते त्यामुळे चार ते पाच महिन्यात ससे विक्रीयोग्य होतात.
 7. सशांची प्रजनन क्षमता चांगली असल्याने मादा ससा प्रजनन वेळी दोन ते बारा पिल्ले देऊ शकते.
 8. आपल्या इथे गाई, म्हशी, बकरी, कोंबड्या यांचे पालन केले जाते त्याच सोबत ससे पालन सुद्धा करू शकतात.