नियम व अटी २

माहिती, नियम व अटी :-

 1. नोंदणी अर्ज भरण्यापूर्वी नियम व अटी आणि स्वयंघोषणापत्र (T&C, Self Declaration) सविस्तर वाचावे.
 2. नोंदणी अर्जात मागितलेली सर्व माहिती ही सविस्तर भरावी.
 3. कुटुंबातील एका पेक्षा अधिक व्यक्तींना नोंदणी अर्ज करावयाचा असल्यास अर्ज करता येईल, त्यासाठी प्रत्येक अर्जदाराला वेगळा अर्ज करणे आवश्यक आहे तसेच प्रत्येक अर्जासाठी शुल्क वेगळा आकारण्यात येईल.
 4. अर्जदारांशी संपर्क हा ई मेल (E-mail), व्हॉंटसअप (what’s app) इ. सुविधाद्वारे होऊ शकतो, त्यामुळे अर्जामध्ये ई मेल आय डी (E-mail ID) व व्हॉंटसअप क्रमांक हा अचूक द्यावा.
 5. अर्जामध्ये नमूद केलेला ई मेल आय डी (E-mail ID) व व्हॉंटसअप क्रमांक चुकीचा असल्या कारणास्तव एनपीआर (NPR) द्वारा पुरवलेली माहिती संबधित अर्जदारापर्यंत न पोहचल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी अर्ज दाराची असेल.
 6. अर्ज प्रक्रिया ही ऑनलाइन पद्धतीने असून कुठल्याही प्रकारचे डॉक्युमेंटस (Documents) कुठेही जमा करण्याची किवां पोस्टाने पाठविण्याची गरज नाही.
 7. नोंदणी शुल्क कोणत्याही बँकेच्या डेबिट कार्ड (ATM), क्रेडीट कार्ड आणि नेट बँकिंग द्वारा भरू शकतो.
 8. अर्जासाठी भरलेल्या शुल्काचा ट्रान्झेकशन एस. एम. एस. (Transaction SMS) भविष्यकालीन उपयोगासाठी सांभाळून ठेवावा.
 9. स्वयंघोषणापत्राची (Self Declaration) प्रिंट काढून ती स्वतःजवळ भविष्यकालीन उपयोगासाठी सांभाळून ठेवावी.
 10. प्रशिक्षण घेण्यासाठी सशुल्क नोंदणी अर्ज करणे बंधनकारक आहे.
 11. नियम व अटी आणि तारखांमध्ये फेरबदलाचे पूर्ण अधिकार एनपीआर फिड & प्रोसेस प्रा. लि. यांनी राखून ठेवलेले आहेत.
 12. एकदा आकारण्यात आलेले नोंदणी शुल्क कुठल्याही परिस्थितीत परत केले जाणार नाही.
 13. कुठलेही गैरवर्तन आढळून आल्यास कुठलीही पूर्व सूचना न देता अर्ज रद्द करण्यात येईल.
 14. प्रशिक्षण हे एक दिवसीय असून प्रशिक्षणार्थी यांनी एनपीआर टीम द्वारे देण्यात येणाऱ्या तारखेत व स्थळावर प्रशिक्षणास स्वःखर्चावर / स्वः जबाबदारी वर उपस्थित राहणे.
 15. प्रशिक्षण हे १५ जानेवारी २०२२ पासून सुरु होईल याची दखल घ्यावी.

 16. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य असल्या कारणास्तव  प्रशिक्षणाची दिनांक निश्चित नसून, प्रशिक्षणार्थी यास दिनांक व स्थळ हे ०५ ते ०६ दिवस अगोदर कळवण्यात येईल.

 17. प्रशिक्षणा संदर्भातील सर्व निर्णय एनपीआर फिड & प्रोसेस प्रा. लि. कडे राखीव असतील, तसेच या प्रशिक्षणा संदर्भातील प्रक्रिया कोणत्याही वेळेस कोणत्याही टप्प्यावर कुठलीही पूर्व सूचना न देता थांबवण्याचे किंवा त्यात बदल करण्याचे सर्व अधिकार एनपीआर फिड & प्रोसेस प्रा. लि. कडे असतील.
 18. भारत सरकारच्या नियमानुसार नोंदणी शुल्कात १८% GST समाविष्ट आहे.